वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती…!**आता पीक कर्ज मिळणार अगदी घरबसल्या…!*

*शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती…!*
*आता पीक कर्ज मिळणार अगदी घरबसल्या…!*

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ‘कृषी ३६०’ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी आपण अत्याधुनिक डिजिटल पीक कर्ज प्रणालीचा दिमाखदार शुभारंभ मा. सा. कन्नमवार सभागृह, चंद्रपूर येथे अत्यंत उत्साहात पार पाडला. या नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमामुळे पारंपारिक कर्ज प्रक्रियेला फाटा मिळणार असून, आता पीक कर्ज प्रक्रिया अधिक जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या सेवा मिळतील आणि त्यांचा वेळ व श्रम दोन्हींची बचत होईल. या सुवर्णक्षणी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते बँकेच्या माहितीपूर्ण नियमावली पुस्तिकेचे तसेच बँकेच्या अत्याधुनिक नवीन संकेतस्थळाचे (Website) अनावरणही करण्यात आले, ज्यामुळे बँकेच्या सर्व सेवा डिजिटल स्वरूपात ग्राहकांसाठी अधिक सुलभ होतील.
या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याचा योग मला आला. कार्यक्रमाला विशेष प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. आयुष नोपानी उपस्थित होते. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (चंद्रपूर) मा. श्री. जयसिंग ठाकूर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. तृणाल फुलझले, बँकेचे उपाध्यक्ष श्री. संजय डोंगरे, मानद सचिव श्री. आवेश खान पठाण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश्वरजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विशेष नोंद: माननीय जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत मॅडम ह्या या निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण कामामुळे, तसेच प्रविण वानखेडे ( विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नागपूर) हे न्यायालयीन कामात व्यस्त असल्यामुळे कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु, त्यांनी आपली चित्रफित (Video Message) पाठवून बँकेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मनापासून अभिनंदन केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यासोबतच बँकेच्या संचालक मंडळातील माझे सहकारी श्री. यशवंत दिघोरे, श्री. गणेश तर्वेकर, श्री. रोहित बोम्मावार, श्री. जयंत टेमुर्डे, श्री. गजानन पाथोडे, श्री. ललित मोटघरे, श्री. सुदर्शन निमकर, श्री. दामोधर मिसार, श्री. उल्हास कर्पे, श्री. विजय बावणे, डॉ. अनिल वाढई, श्री. विलास मोगरकर, श्री. दिनेश चोखारे, श्री. निशिकांत बोरकर व सौ. नंदाताई अल्लुरवार यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केले.
या सोहळ्याला बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी राजाच्या आर्थिक व डिजिटल सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध राहील, हीच आमची भूमिका आहे!
....

Comments