वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

बाळूभाऊ धानोरकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणाला वरोरा येथे विनम्र अभिवादन ; लोकसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प

बाळूभाऊ धानोरकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणाला वरोरा येथे विनम्र अभिवादन ; लोकसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प

बातमी :  -चेतन लूतडे -30/5/2026

वरोरा : लोकनेते स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त वरोरा येथील जनसंपर्क कार्यालयात आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी खासदार प्रतिपाताई धानोरकर सह संपूर्ण कुटुंब व काँग्रेस कार्यकर्ते  पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बाळूभाऊंचे जनतेप्रती असलेले समर्पण, संघर्षमय नेतृत्व आणि लोकसेवेची अखंड तळमळ यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आदरपूर्वक स्मरणात आणली. त्यांचे विचार आणि जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या सभेत पुन्हा दृढ करण्यात आला. कार्यकर्त्यांनी बाळूभाऊंच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन समाजकार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली.

---

Comments