वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*वरोड्यात मध्यरात्री ‘ऑटो’ आगीच्या भक्ष्यस्थानी* *अभ्यंकर वार्डातील घटना*

*वरोड्यात मध्यरात्री ‘ऑटो’ आगीच्या भक्ष्यस्थानी*
 
 *अभ्यंकर वार्डातील घटना*

वरोडा : शाम ठेंगडी 
      शहरातील अभ्यंकर वार्डातील बोबडे लेआउट परिसरात 14 मे च्या मध्यरात्री घडलेल्या एका भीषण घटनेत एक ऑटोला आग लागून तो भस्मसात झाला. 
       सदर ऑटो वार्डातील किशोर वासूदेव राऊत यांच्या मालकीचा असून पेट्रोल+सीएनजी ची सोय असलेल्या या ऑटोला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण ऑटो जळून खाक झाला आहे.
        सुदैवाने, या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी राऊत यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर राऊत यांचा MH 34 BH 4171 क्रमांकाचा ऑटो रात्री घरासमोर उभा असताना अचानक पेटला. आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की पाहता पाहता ऑटोचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. रात्रीच्या शांततेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
हा ऑटोला सीएनजी किट लावलेली असल्यामुळे  मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र भीषण आगीतही सीएनजी टँक सुरक्षित राहिला. टँकचा स्फोट झाला असता तर आजूबाजूच्या घरांना आणि नागरिकांना मोठा धोका धोका होण्याची शक्यता होती. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 
भरवस्तीत लागलेल्या या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की घातपात? या दिशेने आता चर्चांना उधाण आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास वेगाने सुरू आहे.
“माझ्या उदरनिर्वाहाचे साधन डोळ्यादेखत जळून खाक झाले,” अशी भावना मालक किशोर राऊत यांनी व्यक्त केली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments