वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा येथे स्प्लेंडर मोटारसायकल चोरीमेव्हण्याच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल

वरोरा येथे स्प्लेंडर मोटारसायकल चोरी
मेव्हण्याच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल

वरोरा : राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील शेतकरी विनोद दादाजी सातघरे यांच्या स्प्लेंडर प्लस मोटारसायकलची चोरी झाल्याची घटना वरोरा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद सातघरे हे 11 मे 2026 रोजी आकाश ठेंगणे यांच्यासह त्यांच्या हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्लस (क्रमांक MH-29-AX-0569) मोटारसायकलने वरोरा येथे आले होते. त्यांनी सदर मोटारसायकल वैष्णव नगर परिसरातील मेव्हणे शुभम खोपरे यांच्या घरासमोर पार्क करून ठेवली होती. त्यानंतर कामानिमित्त ते बसने चंद्रपूर येथे गेले.
रात्री सुमारे 11.30 वाजता ते परत वरोरा येथे आले असता मोटारसायकल जागेवरच होती. मात्र, दुसऱ्या दिवशी 12 मे रोजी सकाळी 6 वाजता उठून पाहिले असता मोटारसायकल दिसून आली नाही. परिसरात शोध घेतला असता दुचाकीचा कोणताही मागमूस लागला नाही.
अज्ञात चोरट्याने रात्री 11.30 ते सकाळी 6 वाजेदरम्यान अंदाजे 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरून नेल्याची तक्रार विनोद सातघरे यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.




Comments