वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

घर बांधकामाच्या वादातून महिलांवर विटांनी हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

घर बांधकामाच्या वादातून महिलांवर विटांनी हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
वरोरा : घराच्या बांधकामाच्या कारणावरून झालेल्या वादातून महिलांवर विटा फेकून मारहाण केल्याची घटना वरोरा शहरातील राजीव गांधी वार्ड परिसरात घडली. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. कुमुद रविंद्र ऊईके (वय 35) या मजुरीचे काम करतात व आपल्या परिवारासह राजीव गांधी वार्ड येथे राहतात. त्यांच्या घराशेजारी राहणारा ईरफान आरीफ शेख हा दोन महिन्यांपूर्वी त्या परिसरात राहण्यास आला होता. त्याच्या घरी नेहमी काही युवक येऊन दारू व गांजाचे सेवन करत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दि. 29 मे रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराजवळ संडास व घराच्या बांधकामाबाबत चर्चा सुरू असताना आरोपी मोहम्मद रफ्फीक मोहम्मद शफीक पठाण हा मद्यधुंद अवस्थेत तेथे आला. “तुम्ही घराचे बांधकाम कसे करता ते पाहून टाकीन,” असे म्हणत त्याने शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्याने ईरफान आरीफ शेख व सहिजाद रफीक पठाण यांना बोलावून घेतले.
तिघांनी मिळून शिवीगाळ करत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर विटा फेकून मारल्या. यात सौ. कुमुद ऊईके यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली, तर त्यांची बहीण शितल वासेकर हिला कंबरेला विट लागून दुखापत झाली. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या विष्णू पांडुरंग मडावी यांनाही आरोपींनी धमक्या दिल्या. आरोपी दारू व गांजाच्या नशेत असून “मर्डर करून टाकीन” अशी धमकी देत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर फिर्यादी यांनी डायल 112 वर फोन केला असता पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व संबंधितांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले.
या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपी ईरफान आरीफ शेख, मोहम्मद रफ्फीक मोहम्मद शफीक पठाण व सहिजाद रफीक पठाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 115(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments