वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

चारचाकीसाठी ३ लाखांची मागणी; विवाहितेचा पती, सासू व नणंदेवर मानसिक-शारीरिक छळाचा आरोप.

चारचाकीसाठी ३ लाखांची मागणी; विवाहितेचा पती, सासू व नणंदेवर मानसिक-शारीरिक छळाचा आरोप
बातमी :
वरोरा : चारचाकी वाहन खरेदीसाठी माहेरहून दोन ते तीन लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी पती, सासू व नणंदेविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार सौ. प्रियंका शशांक पाटील (वय 31, रा. नागपूर, मूळ रा. विकास नगर, बोर्डा, वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा विवाह 22 ऑगस्ट 2021 रोजी शशांक आनंद पाटील यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुरुवातीपासूनच सासरी मानसिक छळ सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, किरकोळ कारणांवरून पतीकडून वारंवार वाद घालणे, हात मुरगळणे, मोबाईल तोडणे तसेच सासूकडून टोमणे मारून मानसिक त्रास देण्यात येत होता. खाजगी नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला तसेच घरातील सर्व कामकाज करण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
मार्च 2025 मध्ये नणंदेच्या घरी झालेल्या कार्यक्रमानंतरही वाद निर्माण झाला. त्यानंतर 8 मे 2025 रोजी झालेल्या कौटुंबिक बैठकीत पतीने माहेरहून चारचाकीसाठी पैसे आणण्याची मागणी केली. पैसे न आणल्यास घटस्फोट देण्याची धमकी देत घराबाहेर काढल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
तसेच सासूने सोन्याचे दागिने स्वतःकडे ठेवले असून पतीने शैक्षणिक कागदपत्रे परत देण्यास नकार दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वरोरा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments