वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

चिमूर येथील पोलीस पाटील व पत्नीला जातीवाचक शिवीगाळ व हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल

चिमूर येथील पोलीस पाटील व पत्नीला जातीवाचक शिवीगाळ व हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल

चिमूर (जि. चंद्रपुर) - १२ मे २०२६ : येथील क्रांतीनगर भागात पैशांच्या वादातून पोलीस पाटील व त्यांच्या पत्नीवर जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्याची गंभीर घटना आज (मंगळवार, १२ मे) सकाळी घडली. याप्रकरणी चिमूर पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खानगांव येथील रहिवासी तथा पोलीस पाटील प्रदीप संतोष रामटेके (वय ३७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी दोन महिन्यांपूर्वी परिचित भाग्यश्री बावने यांना ७० हजार रुपये दिले होते. आज सकाळी ते पैसे परत घेण्यासाठी तिचा भाऊ नवनित कोसरे याच्याकडे गेले असता वाद झाला. नवनितने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच त्याचे दोन अज्ञात मित्र, आई शोभा कोसरे (वय ५०) व बहीण अश्विनी कोसरे (वय ३०) यांनीही त्यांना व त्यांची पत्नी अश्विनी रामटेके (वय ३२) यांना मारहाण करून लाकडी काडीने बेदम मारले. मारहाणीत प्रदीप रामटेके बेशुद्ध पडले असता पत्नीने त्यांना उठविले. दोघांवर चिमूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चिमूर पोलिस ठाण्यात दाखल प्रथम खबर क्रमांक ०४८३ (दिनांक १२ मे २०२६) अन्वये खालील कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे:

अ.क्र. अधिनियम कलम
१ अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ ३(१)(s) (जातीवाचक शिवीगाळ)
२ अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ ३(२)(v) (अत्याचार)
३ भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ ११८(२) (मारहाण)
४ भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ ११८(१) (गंभीर मारहाण)
५ भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ ३(५) (सामानिक आशय)
६ अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ ३(२)(va) (जातीचा अभिमान दुखावणे)


या प्रकरणी आरोपी नवनित राजेंद्र कोसरे (२२), त्याची आई शोभा राजेंद्र कोसरे (५०), बहीण अश्विनी राजेंद्र कोसरे (३०) तसेच त्यांचे दोन अज्ञात मित्र यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सर्व आरोपी लोहार जातीचे असून याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादीने केली आहे.

Comments