वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

शेगाव बु. येथे अनधिकृत एच.टी.बी.टी. कापूस बियाण्याचा साठा जप्त.

शेगाव बु. येथे अनधिकृत एच.टी.बी.टी. कापूस बियाण्याचा साठा जप्त.

96 पॅकेट संशयास्पद बियाणे जप्त; कृषी विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

वरोरा चेतन लूतडे 13/5/26
चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव बु. ता. वरोरा येथे अनधिकृत व संशयास्पद एच.टी.बी.टी. कापूस बियाण्याची साठवणूक करून विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई कृषी विभागाच्या भरारी पथकाने केली असून आरोपीकडून एकूण 96 पॅकेट कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस स्टेशन शेगाव येथे प्रथम खबर क्रमांक 0160/2026 नोंदविण्यात आला असून हा गुन्हा 13 मे 2026 रोजी पहाटे 00:47 वाजता दाखल करण्यात आला.
फिर्यादी श्री. मारोती संतोषराव वरभे (वय 57), कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय वरोरा यांनी शासनाच्या वतीने तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मे 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे भरारी पथकाने शेगाव बु. येथील श्री. मीतेश किशोर पारोधे यांच्या राहत्या घरी छापा टाकला.
या कारवाईत विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक श्री. एस. टी. पवार, मोहीम अधिकारी श्री. लकेश अंगेश कुमार कटरे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक श्री. श्रावण माधवराव बोडे तसेच कृषी अधिकारी श्री. गजानन पी. हटवार सहभागी होते.
पंच म्हणून श्री. निखील विलास वाढई व श्री. रवींद्र ऋषी दडमल यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
तपासादरम्यान दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये संशयास्पद एच.टी.बी.टी. कापूस बियाणे आढळून आले.
“CHHAVA” नावाच्या बॅगमध्ये 46 पॅकेट तर “TRUST” नावाच्या बॅगमध्ये 50 पॅकेट बियाणे आढळले. सर्व पॅकेट प्रत्येकी 450 ग्रॅम वजनाचे असून एकूण 96 पॅकेट बियाण्यांची किंमत 86 हजार 496 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तपासादरम्यान आरोपी मीतेश किशोर पारोधे यांनी हे बियाणे सेलू तालुका, जिल्हा वर्धा येथील श्री. टेकाडे यांच्याकडून मिळाल्याचे सांगितले.
तक्रारीनुसार, जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांवर उत्पादक, विक्रेता, गुणवत्ता व मान्यता याबाबत आवश्यक माहिती नव्हती. तसेच GEAC मान्यतेचा उल्लेख नसल्याचेही आढळले. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर साठवणूक व विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात खालील कायद्यांअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत —
पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 7, 15, 16
अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 1, 2, 3 व 7
बीज अधिनियम 1966 कलम 7(a), 7(c), 7(d), 19
बियाणे नियंत्रण आदेश 1983 कलम 3 व 8
बियाणे नियम 1968 मधील नियम 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 व 15
भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 कलम 318(4) व 3(5)
शेगाव पोलिसांनी आरोपी श्री. मीतेश किशोर पारोधे, रा. गांधी वार्ड, शेगाव बु., ता. वरोरा, जि. चंद्रपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
..........

Comments