वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वणी संविधान चौकातील मारहाणीप्रकरणी सीसीटीव्ही तपासणीची मागणीशेतकरी व वाहन चालकांवरील हल्ल्यामुळे संताप; वैद्यकीय तपासणीसह दोषींवर कारवाईची मागणी

वणी संविधान चौकातील मारहाणीप्रकरणी सीसीटीव्ही तपासणीची मागणी

शेतकरी व वाहन चालकांवरील हल्ल्यामुळे संताप; वैद्यकीय तपासणीसह दोषींवर कारवाईची मागणी.

वणी : वरोरा तालुक्यातील शेतकरी व वाहन चालक हे मालवाहतूक वाहनांद्वारे जनावरे विक्रीसाठी वनी मार्ग- दुर्भा- सागळी येथील बैल बाजारात नेत असताना वणी येथील संविधान चौक परिसरात काही व्यक्तींनी वाहनांना अडवून मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी, वणी यांना निवेदन देत सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिनांक ५ मे २०२६ रोजी सकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत वणी पोलिसांना लेखी तक्रार देण्यात आली. परंतु पोलीस विभागाने ती तक्रार मान्य न केल्यामुळे वरोरा येथील शेतकरी वापस परतले होते .

वनी येथे सात-आठ व्यक्तींनी स्वतःला बजरंग दलाचे पदाधिकारी असल्याचे सांगून वाहन चालकांना अडविले व पाच ते सहा जणांना मारहाण केली, तसेच कागदपत्रे फाडून जबरदस्तीने पैसे उकळल्याचा प्रकार  करण्यात आला आहे.
या घटनेत गणेश दातारकर, शंकर झाडे, शरद चटकी, राजू गुप्ता, अनिल खैरे आणि नंदकिशोर डोळस यांना मारहाण झाल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित सर्व जनावरे ही शेतकऱ्यांची स्वतःची असून विक्रीसाठी कायदेशीररित्या नेण्यात येत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
संविधान चौक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्या दिवशीचे फुटेज तपासून सत्य समोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
 तसेच रोहन पारखी, शुभम आईकिनवार, धनराज मडावी व इतरांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. वैभव माली, विशाल दुधबळे यांनी पोलिसा स्टेशनमध्ये येऊन वरोरा येथील व्यापारी व शेतकऱ्यांना शिवीगाळ सुद्धा केली होती. मात्र  पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने हा प्रश्न चिघळला आहे. 

दरम्यान, जखमी वाहन चालक व संबंधितांची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून अहवाल नोंदविण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

यानंतर वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांनी रविवारी चालत असलेला कृषी उत्पन्न बाजार समिती मधील बैल बाजारातील बाजार बंद करून आपला निषेध नोंदवला होता.

या याबाबत वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांना निवेदन देण्यात आले यावेळी जगदीश नानाजी गोचे यांच्या नेतृत्वात  देवा शिवशंकर पांडे, अनिल कैलास खैरे, अजय केळसकर, रोशन देठे, अजय पिसदूरकर आधी शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी पोलिसांजवळ केली होती.

Comments