गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

बाबू कोल्ड्रिंक सेंटरवर पोलिसांची कारवाई; अवैध मद्यपानास जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बाबू कोल्ड्रिंक सेंटरवर पोलिसांची कारवाई; अवैध मद्यपानास जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वरोरा : शहरातील नेहरू चौक परिसरातील बाबू कोल्ड्रिंक सेंटर येथे अवैधरित्या मद्यपानासाठी जागा व साहित्य उपलब्ध करून दिल्याच्या आरोपावरून वरोरा पोलिसांनी कारवाई करत दुकान मालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ मे २०२६ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सुखराज यादव व इतर पोलीस कर्मचारी वरोरा शहरात अवैध दारू विक्री व जुगार प्रतिबंधासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी नेहरू चौक येथील बाबू कोल्ड्रिंक सेंटरमध्ये लोकांना बिनापरवाना मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी दुकानावर छापा टाकला असता दोन व्यक्ती टेबलावर दारूच्या बाटल्या ठेवून मद्यपान करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच संबंधित दोघे घटनास्थळावरून पसार झाले. यावेळी दुकानाच्या काउंटरवर उपस्थित असलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत अशोकराव नरड (वय ४०, रा. शेगाव बु., ता. वरोरा) असे सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळावरून अर्धवट भरलेले दारूचे ग्लास, देशी दारूच्या निप, तसेच पाण्याच्या बाटल्या असा सुमारे १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला माल सील करून तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रशांत नरड याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments