वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

मार्डा येथे ट्रॅक्टरमध्ये लपून बसलेला संशयित युवक ताब्यात; चोरीच्या उद्देशाचा पोलिसांना संशय

मार्डा येथे ट्रॅक्टरमध्ये लपून बसलेला संशयित युवक ताब्यात; चोरीच्या उद्देशाचा पोलिसांना संशय

बातमी: चेतन लूतडे 6/5/26

वरोरा : तालुक्यातील मौजा मार्डा येथे मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये संशयास्पदरीत्या लपून बसलेल्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई ६ मे रोजी पहाटे १.४० वाजताच्या सुमारास रात्र गस्तीदरम्यान करण्यात आली.
पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे व पोलीस कर्मचारी विशाल राजुरकर हे वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मार्डा गावात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर (क्र. एमएच 27 डीए 4721) च्या ट्रॉलीमध्ये एक इसम संशयास्पदरीत्या लपून बसलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव सुमित कैलास सयाम (वय 20, रा. घोडाझरी ता. नागभीड, सध्या खातोडा ता. वरोरा) असे सांगितले.
मात्र, तो ट्रॅक्टरमध्ये का लपला होता याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्याच्या हालचाली व वर्तन संशयास्पद असल्याने चोरीसारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो परिसरात फिरत असल्याचा पोलिसांना संशय आला. यानंतर पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.

Comments