वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

लग्नसराईत घरफोडीचा धोका वाढला; वरोरा पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आव्हान.

लग्नसराईत घरफोडीचा धोका वाढला; वरोरा पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
बातमी:

वरोरा : लग्नसराईच्या हंगामात अनेक नागरिक आपल्या घरांना कुलूप लावून बाहेरगावी कार्यक्रमासाठी जात असल्याने घरफोडीच्या घटनांचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन वरोरा यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांच्या निवेदनानुसार, घर बंद करून बाहेर जाताना काही महत्त्वाच्या गोष्टींची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. घराचे कुलूप बाहेरून टॉर्च मारल्यावर दिसणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच लोखंडी गेटला बाहेरून कुलूप न लावता आतूनच लॉक करावे, जेणेकरून घर बंद असल्याचे सहज लक्षात येणार नाही.
याशिवाय, घरात मौल्यवान वस्तू किंवा मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवणे टाळावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती रात्री किंवा दिवसा फिरताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वरोरा पोलिसांनी नागरिकांना सावध राहून स्वतःच्या आणि परिसराच्या सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

...........


Comments