वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वारासह मित्राचा जागीच मृत्यू

वरोरा-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वारासह मित्राचा जागीच मृत्यू

बातमी: चेतन लूतडे/4/5/26

वरोरा : चंद्रपूर ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी ते नंदोरी दरम्यान रविवारी (दि. 03 मे) रात्री भीषण अपघात घडून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खानगाव (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) येथील चंद्रशेखर दत्तुजी वाल्दे (वय 27) व त्यांचा मित्र मयुर प्रभाकर हाडके (वय 30) हे दोघे दुचाकीने (MH-32-BA-7386, होंडा शाईन) चंद्रपूरहून नागपूरकडे जात होते. टाकळी ते नंदोरी दरम्यान समोरून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप (MH-34-BQ-0156) वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार चंद्रशेखर वाल्दे व त्यांचा मित्र मयुर हाडके यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दोघांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी बोलेरो पिकअप चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे खानगाव परिसरात शोककळा पसरली असून, दोन्ही मृतकांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Comments