वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा येथे पहिल्यांदाच पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न

संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा येथे पहिल्यांदाच पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न

वरोरा, ३० एप्रिल – स्थानिक संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक वर्ग (नर्सरी ते युकेजी) साठी पहिल्यांदाच पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा अपेक्षा मालू होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक प्राचार्या राणी पटेल, उपप्राचार्या श्रद्धा चौबे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती शास्त्रकार यांनी केले.

या समारंभात विद्यार्थ्यांना एक-एक करून स्टेजवर बोलावून त्यांना डिग्री सर्टिफिकेट व पुष्पगुच्छ देऊन पालकांसह सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी आणि पालकांनी मनोगत व्यक्त केले. पालकांनी आपल्या पाल्यांना डिग्री ड्रेसमध्ये पाहून भावी इंजिनियर, डॉक्टर, जिल्हाधिकारी या रूपात अनुभवले, त्यामुळे सर्वच उत्साही झाले.

प्राचार्या राणी पटेल यांनी मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन उज्वला झंजल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सारिका दातारकर, भाग्यश्री फेतफुलवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Comments