वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

खांबाळा येथे अवैध देशी दारू साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई35 रॉकेट संत्रा दारूच्या बाटल्या जप्त; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल.

खांबाळा येथे अवैध देशी दारू साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
35 रॉकेट संत्रा दारूच्या बाटल्या जप्त; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल.

वरोरा 16/5/26
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने वरोरा तालुक्यातील खांबाळा येथे धाड टाकून अवैधरित्या देशी दारू साठवून ठेवणाऱ्या युवकाविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 35 रॉकेट संत्रा देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
15 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन वामन गुरनुले व त्यांच्या पथकाला मुखबिरामार्फत माहिती मिळाली होती की, खांबाळा येथील अधिक चंद्रकांत बोरकर (वय 22) हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या देशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह खांबाळा येथे छापा टाकला.
यावेळी आरोपी घरासमोरील पलंगावर बसलेला आढळला. पंचासमक्ष घराची झडती घेतली असता पलंगाखाली ठेवलेल्या थैलीमध्ये रॉकेट संत्रा कंपनीच्या 90 एम.एल. क्षमतेच्या 35 सिलबंद प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत अंदाजे 1 हजार 400 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीकडे दारू साठवण्याबाबत कोणताही वैध परवाना नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून दारू जप्त केली. जप्त मालातील एक बाटली रासायनिक विश्लेषणासाठी सीलबंद करण्यात आली असून आरोपीला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी अधिक चंद्रकांत बोरकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments