वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

साकार नगर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 3 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्तवरोरा पोलिसांची कारवाई; सहा आरोपी ताब्यात, एक आरोपी फरार

साकार नगर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 3 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त
वरोरा पोलिसांची कारवाई; सहा आरोपी ताब्यात, एक आरोपी फरार
वरोरा : शहरातील साकार नगर परिसरातील मागील ले-आऊट भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी धाड टाकून सहा आरोपींना ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून रोख रक्कम, पत्ते व चार दुचाकी असा एकूण 3 लाख 74 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 27 मे रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे यांच्या फिर्यादीवरून वरोरा पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली होती की, साकार नगर परिसरातील मोकळ्या जागेत काही इसम बावन्न पत्त्यांवर पैशाची हारजीत लावून जुगार खेळत आहेत. त्यानंतर पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.
धाडीदरम्यान आरोपी नामे शहजाद जाफर शेख (29), सागर सुभाष वैद्य (28), कृष्णा कैलास थोरात (34), सुरज बालाजी गोहणे (27), आकाश गणेश बन्सोड (29) व  कश्टी (49) यांना ताब्यात घेण्यात आले. तर एक आरोपी पोलिसांना पाहून पसार झाला.
घटनास्थळावरून बावन्न पत्ते, डावावरील 1 हजार 100 रुपयांची रोकड तसेच आरोपींकडून 3 हजार 200 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय चार दुचाकी वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त वाहनांमध्ये होंडा शाईन, अ‍ॅक्टिव्हा व रॉयल एनफिल्ड बुलेटचा समावेश आहे.
सदर कारवाईत एकूण 3 लाख 74 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ)
सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप मुळे, प्रशांत नागोसे, नितीन रायपुरे तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

Comments