गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

आझाद वॉर्डमध्ये अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई.26 राकेट देशी दारूच्या बाटल्या जप्त; आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल.वीना लायसन मोठ्या प्रमाणात शहरात दारू विक्री.

आझाद वॉर्डमध्ये अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई.
26 राकेट देशी दारूच्या बाटल्या जप्त; आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल.

वीना लायसन मोठ्या प्रमाणात शहरात दारू विक्री. 

वरोरा- 13/5/26
वरोरा शहरातील आझाद वॉर्ड परिसरात अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या युवकावर वरोरा पोलिसांनी कारवाई करून मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त केली. ही कारवाई 11 मे 2026 रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार अमोल मारोती नवघरे, पो.हवा. सुखराज यादव व इतर पोलीस कर्मचारी अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, आझाद वॉर्ड येथे राहणारा वैभव रमेश ब्राम्हणे (वय 24) हा आपल्या घरासमोर अवैधरित्या देशी दारू विक्री करीत आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली. यावेळी आरोपीच्या घराच्या अंगणातील प्लास्टिकच्या पिशवीत 26 नग राकेट देशी दारूच्या 90 एमएलच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 1 हजार 40 रुपये असल्याचे सांगण्यात आले.
त्या दारू बॉटल कोणत्या दुकानातून खरेदी केल्या. बिना लायसन इतक्या मोठ्या प्रमाणात देशी दारू कशी खरेदी केली याची विचारणा सुद्धा होणार असल्याचे कळले. 

पोलिसांनी पंचासमक्ष एक बाटली नमुना म्हणून सील करून उर्वरित मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वरोरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
या प्रकरणी आरोपी वैभव रमेश ब्राम्हणे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments