वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

चंद्रपूर शहर पोलिसांची मोठी कारवाईमहाकाली कॉलरी परिसरात अवैध मोहफुल दारू भट्टी उद्ध्वस्त; 22 हजारांचा मुद्देमाल जप्त.

चंद्रपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई
महाकाली कॉलरी परिसरात अवैध मोहफुल दारू भट्टी उद्ध्वस्त; 22 हजारांचा मुद्देमाल जप्त.

चंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलिसांनी महाकाली कॉलरी परिसरात अवैध मोहफुल दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या महिलेवर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत मोहफुल सडवा, तयार दारू व दारू निर्मितीचे साहित्य असा एकूण 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे हे पोलीस पथकासह 15 मे 2026 रोजी प्रोव्हिबिशन व जुगारविरोधी कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, आनंदनगर महाकाली कॉलरी परिसरातील एका घरात अवैधरित्या मोहफुल दारू तयार करून विक्री केली जात आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली. तेथे विमल प्रसाद कोतपल्लीवार (वय 40), रा. आनंदनगर, महाकाली कॉलरी, चंद्रपूर ही महिला आपल्या घराच्या मागील बाजूस चुलीवर मोहफुल दारू तयार करत असल्याचे निदर्शनास आले.
घरझडतीदरम्यान पोलिसांना 300 लिटर मोहफुल सडवा, 50 लिटर तयार मोहफुल दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे जर्मन केतल्या, टिनाचे पिंप, प्लास्टिक ड्रम, बादल्या व इतर साहित्य मिळून आले.
जप्त मुद्देमाल
300 लिटर मोहफुल सडवा — किंमत 15,000 रुपये
50 लिटर मोहफुल दारू — किंमत 7,000 रुपये
दारू तयार करण्याचे साहित्य — जर्मन केतल्या, टिन पिंप, प्लास्टिक ड्रम, बादल्या आदी
असा एकूण 22 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून उर्वरित मोहफुल दारू व सडवा पंचांसमक्ष नष्ट करण्यात आला. तसेच दारू तयार करण्यासाठी वापरलेले साहित्यही फोडण्यात आले.
या प्रकरणी विमल प्रसाद कोतपल्लीवार हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई), 65 (फ), 65 (ब), 65 (क) अन्वये चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


Comments