वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

माढेळी येथे अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई20 रॉकेट संत्रा दारूच्या बाटल्या जप्त; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.


माढेळी येथे अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई
20 रॉकेट संत्रा दारूच्या बाटल्या जप्त; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

वरोरा चेतन लूतडे -16/5/26

वरोरा पोलिसांनी माढेळी परिसरात अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करत 20 रॉकेट संत्रा देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई 26 मार्च 2026 रोजी करण्यात आली.
पोलीस अंमलदार रोशन हरीचंद्र तामसेटवार व पोउपनि मधुकर सामलवार यांच्या पथकाला मुखबिरामार्फत माहिती मिळाली होती की, माढेळी येथील दिलीप विनायक पंधरे (वय 55) हे वडगाव रोडवरील आपल्या राहत्या घरी अवैधरित्या दारू विक्री करीत आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली.
घरझडतीदरम्यान घरातील पहिल्या खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या कापडी पिशवीमध्ये रॉकेट संत्रा कंपनीच्या प्रत्येकी 90 मि.ली. क्षमतेच्या 20 सिलबंद प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत अंदाजे 800 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला. आरोपीकडे दारू साठवण्याबाबत कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी दिलीप विनायक पंधरे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments