लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त


गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त

वरोरा, दि. २० एप्रिल २०२६: शहरातील गांधी चौक परिसरात पानठेल्याच्या आडून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका संशयित जुगारीला ताब्यात घेत त्याच्याकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० एप्रिल रोजी पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे (बं.नं. २५७१) व त्यांच्या पथकातील अंमलदार मनोज ठाकरे व विशाल राजुरकर हे खाजगी वाहनाने शहरात अवैध जुगार प्रतिबंधासाठी गस्त घालत होते. यादरम्यान पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, मौजा गांधी चौक येथील पानठेल्यासमोर शेख अरबाज नावाचा एक इसम लोकांकडून पैसे घेऊन टाईम बाजार सट्टापट्टी आकड्याचा जुगार खेळवत आहे.

माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र साक्षीदारांना पंच म्हणून बोलावले. पंचांसह पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता, तेथे एक व्यक्ती कागदावर आकडे लिहून सट्टा खेळवताना आढळून आली.

पंचांसमक्ष चौकशी केली असता, संशयिताने आपले नाव शेख अरबाज शेख रफिक (वय २६, रा. मिलन चौक, वरोरा) असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून टाईम बाजार सट्टापट्टीचे आकडे लिहिलेला कागद, एक निळ्या रंगाचा बॉलपेन (किंमत ५ रुपये) तसेच १,१५० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १,१५५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 
हे सट्ट्याचे  आकडे कोणाकडे उतरवित होता. वरोरा शहरांमध्ये अजून कोण कोण साथीदार काम करीत आहे? , मोबाईल मध्ये कोणाकोणाला सट्टा खेळवत होता. याबाबत पोलीस तपास करीत आहे. वरोरा शहरात अशा अनेक चौका चौकात ह्या सट्यापट्ट्या घेतल्या जातात. ही  कारवाई पोलिसांनी करून सट्टा बाजारातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर  किळ ठोकली आहे. परंतु सट्टा पट्टी चालवणारे खरे मालक अजूनही पोलिसांच्या रडारा बाहेर असल्याचे दिसते.

पोलिसांनी घटनास्थळीच जप्तीचा पंचनामा तयार करून आरोपी शेख अरबाद याला ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याच्याविरुद्ध वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
...

Comments