वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हातमाणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हात

माणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ
बातमी:
चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर तर्फे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या १० वर्षीय कुमारी रोही सिंह हिला मदतीचा हात देण्यात आला आहे. ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत ही मदत करण्यात आली असून, तिच्या उपचारांसाठी महत्त्वाचे सहकार्य मिळाले आहे.
मुळचे उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील नागेंद्र सिंह हे सध्या नागपूर येथे उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. त्यांची अल्पवयीन मुलगी रोही सिंह हिला हाडांचा कॅन्सर (Bone Cancer) झाला असून, या गंभीर आजारामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अशा कठीण परिस्थितीत ट्रस्टने पुढाकार घेत तिच्या उपचारांसाठी आर्थिक तसेच नैतिक आधार दिला आहे.
या उपक्रमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर एका निरागस मुलीला नव्याने जगण्याची आशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रोही ही या आजारावर मात करून पुन्हा आनंदाने जीवन जगेल, असा विश्वास ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ प्रभावीपणे राबविणाऱ्या ट्रस्टच्या सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजातील इतरांनीही पुढाकार घेऊन अशा गरजू कुटुंबांना मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Comments