वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

नागपुरात अत्याधुनिक ‘नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट’चे भूमिपूजन; मध्य भारताला मिळणार जागतिक दर्जाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय

नागपुरात अत्याधुनिक ‘नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट’चे भूमिपूजन; मध्य भारताला मिळणार जागतिक दर्जाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय

नागपूर : प्रतिनिधी
मध्य भारतातील आरोग्य सेवेला नवे बळ देणाऱ्या अत्याधुनिक ‘नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट’ या मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीचा शुभारंभ भूमिपूजन सोहळ्याने झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
धरमपेठ येथील नॉर्थ अंबाझरी मार्गावर डॉ. आबाजी थत्ते सेवा अनुसंधान संस्थेच्या वतीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. या वेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, सचिव शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुमारे ४६१ बेड क्षमतेचे हे रुग्णालय २३ मजली सुसज्ज इमारतीत उभारले जाणार असून हेलिपॅड आणि एअर ॲम्बुलन्ससारख्या आधुनिक सुविधांनी ते सुसज्ज असेल. सुमारे पाच लाख चौरस फूट क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या संस्थेत अत्याधुनिक उपचारांसह अवयव प्रत्यारोपण, बर्न वॉर्ड, हृदयविकार, न्यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, युरोलॉजी, क्रीडा वैद्यक, प्लास्टिक व पुनर्रचना शस्त्रक्रिया अशा विविध सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध होणार आहेत. विशेषतः अवयव प्रत्यारोपण सुविधेवर विशेष भर दिला जाणार आहे.
याशिवाय या संस्थेत पदव्युत्तर व सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, आरोग्य सेवेसोबतच वैद्यकीय शिक्षणालाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नागपूरसह संपूर्ण मध्य भारतातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

.................

Comments