वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा येथे भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने चार लाखांचे नुकसान

वरोरा येथे भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने चार लाखांचे नुकसान

वरोरा, दि. 29 एप्रिल – शेंबळ फाट्याजवळ दि.27/4/26ला  रात्री दहा वाजता एका भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले असून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रॅक्टर चालकाला दुखापत झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, देवराल (ता. मोहदा) येथील शेतकरी रामराव रामकृष्ण नंदन हे आपल्या मित्राचे ट्रॅक्टर (क्र. MH 34 BR 5019) शेतीच्या कामासाठी वापरतात. ट्रॅक्टर चालक गणेश क्षीरसागर हे वणीहून वरोराकडे येत होते. शेंबळ फाट्याजवळ टोल ओलांडल्यानंतर ते वरोरा बायपासच्या समोर गेले. वाट चुकल्याने ते परत आले आणि वरोराकडे वळत असतानाच वरोराकडून वणीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. MH 04 LY 7972) त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार ठोसा मारला.

ट्रक चालकाने नाव शब्बीर अहमद (वय ५६, रा. राजुर, ता. वणी, जि. यवतमाळ) असे सांगितले. या अपघातात ट्रॅक्टरचे मुंडीचे दोन तुकडे झाले. रात्री उशिरा ट्रक मालक न आल्याने तक्रार देण्यास उशीर झाला. सोमवारी रामराव नंदन यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी रिपोर्ट दिली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments