वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

अनोळखी इसमाला लिफ्ट देणे महागात पडले.गाडी मोबाईल घेऊन चोरटा पसार, वरोरा पोलीसात तक्रार दाखल

अनोळखी इसमाला लिफ्ट देणे महागात पडले.

गाडी मोबाईल घेऊन चोरटा पसार, वरोरा पोलीसात तक्रार दाखल .

वरोरा, दि. २० एप्रिल २०२६: शहरातील बोर्डा चौक परिसरात एका धनगर युवकाला दारू पाजल्यानंतर त्याची मोटरसायकल आणि मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याची पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भादंवि कलम ३०३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश सुरेश आस्कर (वय ३८, रा. डोंगरगाव खडी, ता. भद्रावती) हे व्यापारी मजूर आहेत. दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी ते आपल्या हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक (क्र. एम.एच. ३४ सी.ई. ५७३९) या मोटरसायकलवरून येत असताना त्यांनी कोंढा फाट्याजवळ एका अनोळखी व्यक्तीला वरोरापर्यंत लिफ्ट दिली.

वाटेत गप्पा मारताना त्या इसमाने स्वतःला मध्यप्रदेशचा रहिवासी असल्याचे सांगितले. त्याचा स्वभाव पटल्याने फिर्यादीने त्याला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बोर्डा चौकातील देशी दारूच्या दुकानात दारूपिण्यासाठी नेले. गाडी दुकानासमोर लावून दोघेही दारू प्यायले. दारूचे पैसेही फिर्यादीनेच भरले.

थोड्याच वेळात आरोपीने फिर्यादीकडे मोबाईल फोन मागितला आणि "तुम्ही फळे घेऊन या, मी इथेच थांबतो" असे सांगत गाडीची चावी व मोबाईल स्वतःजवळ ठेवून घेतले. फिर्यादी प्रकाश आस्कर हे फळे घेण्यासाठी गेले आणि परत आले तेव्हा दुकानासमोर ना त्यांची गाडी होती ना तो अनोळखी इसम.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर अनोळखी चोरट्याने सुमारे ३०,००० रुपये किमतीची जुनी वापरातील मोटरसायकल व ५,००० रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल असा एकूण ३५,००० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

---

Comments