लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

अवैधरित्या जनावरांची वाहतूक उघडकीस — ६३ जनावरे, ५८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त; ५ आरोपी अटकेत

अवैधरित्या जनावरांची वाहतूक उघडकीस — ६३ जनावरे, ५८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त; ५ आरोपी अटकेत


चंद्रपूर शहरात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. दोन ट्रक आणि एका पायलट वाहनासह ६३ जनावरे जप्त करण्यात आली असून एकूण ५८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली असून ११ जणांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी :
दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एम.ई.एल. माका, मुल रोड, चंद्रपूर येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान दोन टाटा कंपनीच्या ट्रकमधून अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेत ६३ जनावरे जप्त केली. तसेच पायलटिंगसाठी वापरलेले चारचाकी वाहन आणि आरोपींचे ५ मोबाईल असा एकूण ५८,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली असून ११ आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने प्यार फाउंडेशन, छोटा नागपूर, जिल्हा चंद्रपूर येथे सुपूर्द करण्यात आली आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

सदर प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

Comments