वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टनी दिला कॅन्सर रुग्णाला आधार**‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत आर्थिक सहकार्य*

*रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टनी दिला कॅन्सर रुग्णाला आधार*

*‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत आर्थिक सहकार्य*

भद्रावती :
समाजातील उपेक्षित व गरजू घटकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टने आपल्या सामाजिक बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती देत ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील कॅन्सर रुग्ण संदीप बाळकृष्ण निब्रड यांना उपचारासाठी आर्थिक सहकार्य केले आहे.

संदीप निब्रड हे सध्या नागपूर येथील वोकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. उपचारासाठी लागणारा प्रचंड खर्च भागवणे अशक्य झाल्याने त्यांच्या पत्नी मोहीनी निब्रड यांनी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती अश्लेषा भोयर यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उपसभापती अश्लेषा भोयर यांनी तात्काळ ट्रस्टचे संस्थापक तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे आणि ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांर्भीय व तातडीच्या उपचाराची गरज लक्षात घेऊन ट्रस्टमार्फत त्वरित निधी मंजूर करण्यात आला व सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्या. भद्रावतीचे नवनिर्वाचित अध्यक्ष दादाजी भट व उपाध्यक्ष ॲड. निलेश पिंगे यांच्या हस्ते रुग्णाच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

या वेळी ट्रस्टचे संस्थापक तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, कोषाध्यक्षा सुषमा शिंदे तसेच सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्या. भद्रावती नवनिर्वाचित संचालक लक्ष्मण खाडे, संतोष काळे, पुरुषोत्तम कोंगरे, विलास घोटकर, जनार्धन नन्नावरे, युवराज निबुधे, आण्याजी लांबट, श्रीकांत डोंगे, पंढरी खंगार, गोपीका सुर, रत्नमाला आस्कार यांच्यासह भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू डोंग, उपसभापती अश्लेषा भोयर, संचालक गजानन उताणे, श्री साई नागरी सहकारी संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष प्रवीण सुर तथा मंगेश भोयर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

ट्रस्टच्या ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत यापूर्वीही अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना उपचाराकरीता सहकार्य करीत आर्थिक मदत करण्यात आली आहे. “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे व गरजवंताना नेहमीच सहकार्य करणार,” अशी भावना व्यक्त करत ट्रस्टचे संस्थापक रवींद्र शिंदे यांनी गरजूंनी ट्रस्टशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टने आजवर आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना ‘शैक्षणिक दत्तक’ योजनेद्वारे शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलणे, गरजू कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह लावून देणे, तसेच दिव्यांगांना मोफत तीनचाकी सायकली देऊन स्वावलंबी बनवणे अशा विविध उपक्रमांमुळे ट्रस्टने विर्दभात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Comments

  1. पाच हजार मदत देता आणि जाहिरात देऊन खूप काही केलं असं दाखवून रुग्णांची जाहिरात करता,दान देणारा जाहिरात देऊन मी केलं असं दाखवत नाही

    ReplyDelete

Post a Comment