लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलवर कारवाई; नोंदणी रद्द, ऑपरेशन थिएटर सील

ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलवर कारवाई; नोंदणी रद्द, ऑपरेशन थिएटर सील

बातमी: अंकूश अवथे 
चंद्रपूर : ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद हॉस्पिटलवर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई करत रुग्णालयाची नोंदणी रद्द केली असून ऑपरेशन थिएटर सील करण्यात आले आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर तीन रुग्णांना जंतूसंसर्ग होऊन त्यांची दृष्टी गेल्याची गंभीर तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी या रुग्णालयात तीन रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित रुग्णांची दृष्टी गेल्याची तक्रार अलीकडेच जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. या पार्श्वभूमीवर चौकशी समिती नेमण्यात आली होती.
चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे. ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र नेत्ररोग विभागास मान्यता नसतानाही अवैधरित्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालवून शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी माहिती दिली.
बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचे उल्लंघन झाल्यामुळे रुग्णालयाची नोंदणी रद्द करून ऑपरेशन थिएटर सील करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
ख्रिस्तानंद हॉस्पिटल हे या भागातील नामांकित व सेवाभावी रुग्णालय म्हणून ओळखले जात होते. ख्रिश्चन मिशनरीतर्फे चालविण्यात येणाऱ्या या रुग्णालयात अल्प दरात उपचार मिळत असल्याने रुग्णांचा मोठा ओघ असायचा. मात्र, या घटनेनंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाई केली आहे.

Comments