लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

सेंट ॲनिस पब्लिक स्कूलचा निष्काळजीपणा उघडचुकीच्या पुस्तक यादीने पालकांमध्ये संभ्रम; पालकांना वेठीस धरण्याचा प्रकार

सेंट ॲनिस पब्लिक स्कूलचा निष्काळजीपणा उघड

चुकीच्या पुस्तक यादीने पालकांमध्ये संभ्रम; पालकांना वेठीस धरण्याचा प्रकार

वरोरा, १/४/२६ : एनसीईआरटीच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) नुसार नवीन अभ्यासक्रम लागू झाला असून जुनी पुस्तके बदलवत, इयत्ता 6, 7, 8 साठी नवीन सामायिक पुस्तके लागू करण्यात आली आहेत. मात्र, रिझल्टच्या दिवशी सेंट ॲनिस पब्लिक स्कूल वरोरा शाळा व्यवस्थापनाने जुन्या पुस्तकांची चुकीची यादी पालकांना देऊन ती पुस्तके विकत घेण्याचे सांगत मोठा संभ्रम निर्माण केला. ही जुनी पुस्तके बाजारात कुठेही उपलब्ध नसल्याने पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. शाळेने जाणीवपूर्वक पालकांना वेठीस धरल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.

वरोरा येथील सेंट ॲनिस पब्लिक स्कूलवर शिक्षण विभागाने यापूर्वीच बेकायदा पुस्तक विक्रीप्रकरणी कारवाई केली होती. मात्र, तरीही या शाळेचा बेजबाबदारपणाचा प्रकार उजेडात आला आहे. दिनांक 30 मार्च रोजी इयत्ता 5, 6, 7 चे रिझल्ट शाळेतून देण्यात आले होते. यावेळी शाळेने इयत्ता सहा, सात आणि आठच्या कालबाह्य झालेल्या जुन्या पुस्तकांची यादी शाळेत लावली होती. पालकांना या यादीचा फोटो काढून पुस्तके विकत घेण्यास सांगण्यात आले.

पालकांनी ही यादी घेऊन स्थानिक बाजारपेठेत पुस्तकांसाठी धाव घेतली. मात्र, एनसीईआरटीने पुस्तके बदलल्याने नवीन धोरणानुसार नवीन पुस्तके बाजारात उपलब्ध होती. शाळेने दिलेल्या यादीनुसार पुस्तके बाजारात नसल्याने पालक हैराण झाले. त्यांनी गावातील अनेक पुस्तकांची दुकाने पालथी घातली, परंतु त्यांना अपेक्षित पुस्तके मिळेनाशी झाली. काही पालकांनी शाळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

'विक्रेत्याकडून पुस्तके खरेदी करण्यास भाग पाडले'

शाळेकडून नागपूर येथील एका विशिष्ट विक्रेत्याला पुस्तक विक्रीचे काम देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पालकांना जाणीवपूर्वक चुकीची यादी देऊन गावात पुस्तके उपलब्ध नसल्याचे दाखवून शेवटी पालकांना त्या विक्रेत्याकडून पुस्तके विकत घेण्यास मजबूर करण्याचा डाव शाळेने रचल्याचा सवाल पालकांमध्ये निर्माण झाला आहे.

शाळेच्या प्राचार्य श्रीजा लुईस यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता संपर्क झाला नाही.
या शैक्षणिक संस्थेने सेवाभावाचा उदात्त हेतू ठेवून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात समाजकार्य करत असल्याचे भासवले असले, तरी शंभर टक्के पुस्तक विक्री व त्यातील नफा मिळवण्याच्या उद्देशाने शाळा सुरू होण्यापूर्वीच काही खाजगी प्रकाशनाची पुस्तके बदलल्याची माहिती समोर आली आहे.

शाळेने 'नॉलेज प्लस' नावाचे जीके, हिंदी व्याकरणासारखी पुस्तके शाळा सुरू होण्याच्या सहा दिवस आधी बदलून त्याऐवजी महागडी पुस्तके लावल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूर येथील विक्रेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वीच शाळेने खाजगी प्रकाशनाची पुस्तकांची यादी विक्रेत्याला दिली होती. त्यानुसार खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकांची बंच (गठ्ठे) तयार करण्यात आली होती. मात्र, अचानक शाळेकडून काही खाजगी प्रकाशनाची पुस्तके बदलण्याचे आदेश देण्यात आले. अगदी ऐनवेळी विक्रेत्याकडून बंचमधून पुस्तके काढण्यास सांगितल्याची माहिती आहे.
शाळेच्या या कारभारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून, शिक्षण विभागाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.


Comments