वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा येथे हायटेन्शन तारांवर कोसळला विद्युत खांब; अक्षय सोनटक्के यांच्या तत्परतेने टळला अनर्थ


वरोरा येथे हायटेन्शन तारांवर कोसळला विद्युत खांब; अक्षय सोनटक्के यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

बातमी: चेतन लूतडे 

वरोरा – काल रात्री बोर्डा चौक, वरोरा येथे एक धोकादायक घटना घडली. महामार्गावरील विद्युत खांब अचानक कोसळून थेट महावितरण कंपनीच्या हायटेन्शन तारांवर आदळला. या भीषण प्रसंगामुळे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

मात्र, या गंभीर परिस्थितीत अक्षय सोनटक्के यांनी प्रसंगावधान व धाडस दाखवत तत्काळ पोलीस स्टेशन वरोरा, MSEB (वीज वितरण विभाग) आणि टोल यंत्रणेशी संपर्क साधला. त्यांच्या या त्वरित कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळला.

अक्षय सोनटक्के यांचे हे कर्तव्यदक्षतेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून, त्यांनी केलेल्या सूज्ञतेने अनेक जीव वाचले. प्रशासनाकडूनही त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Comments