लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल

बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल

बातमी:30/4/2026

वरोरा : तालुक्यातील बांद्रा येथे अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १,०८० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी पोलिस पथक पेट्रोलिंगदरम्यान असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बांद्रा येथील सुरज उमेश दोहतरे हा आपल्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली.
कारवाईदरम्यान सुरज दोहतरे घरी नसल्याने त्याची पत्नी वनिता सुरज दोहतरे (वय २७) हिची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पंचासमक्ष घरझडती घेतली असता स्वयंपाकघरातील भांड्याखाली कापडी पिशवीत ९० एम.एल.च्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या २७ बाटल्या देशी दारू आढळून आल्या.
सदर दारूबाबत कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. नमुना म्हणून एका बाटलीला सील करून रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहे.
या प्रकरणी वनिता सुरज दोहतरे व सुरज उमेश दोहतरे (रा. बांद्रा, ता. वरोरा) यांच्याविरुद्ध मद्य निषेध कायद्यानुसार कलम ६५(ई), ८३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

....

Comments