वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

खूनाच्या आरोपीस ७ वर्षाचा सक्षम कारावास व दंड**खेमजई येथील घटना**आरोपीस आज सुनावली सजा*

*खूनाच्या आरोपीस ७ वर्षाचा सक्षम कारावास व दंड*
*खेमजई येथील घटना*
*आरोपीस आज सुनावली सजा*

 वरोडा : ठेंगडी सर
      जमिनीच्या वादातून पुतण्याने काकाचा खून केल्याच्या आरोपावरून पुतण्यास ७ वर्षाचा कारावास व वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज 22 एप्रिल रोज बुधवार ला सुनावली.
         घटनेची माहिती वरोडा तालुक्यातील खेमजई येथे कवडू झित्रा दडमल वय 60 वर्ष व यशवंत भाऊराव दडमल वय ३० वर्ष राहत होते. यांच्यात काका पुतण्याचे नाते होते. त्यांचा वडिलोपार्जित जागेवरून नेहमी वाद होत होता. आरोपी हा मृतकाला नेहमी जागेवरून टोमणे मारून,तू माझ्या पत्नीकडे का पाहतोस असे म्हणत सतत धमकी देत होता.
      याच कारणावरून 12 एप्रिल 2021 ला सायंकाळी 7:45 च्या सुमारास आरोपी यशवंतने मृतक कवडू हा आपल्या दोन नातवंडासह घरात असतांना त्याचे डोक्यावर लाकडी टेणप्याने वार करून जखमी केले. मृतक जमिनीवर खाली पडला असतानाही त्याच टेणप्याने त्यास मारले असता कवडू दडमल हे मरण पावले.
       मृतकाची पत्नी लिलाबाई कवडू दडमल यांनी घटनेची तक्रार शेगाव पोलीस स्टेशनला केल्यानंतर शेगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय महादेव सरोदे यांनी घटनेचा तपास करून वरोडा येथील अतिरिक्त सत्र  न्यायालयात केस दाखल केली. या केसचा निकाल आज 22 एप्रिल 2026 रोज बुधवारला लागून न्यायालयाने आरोपी यशवंत भाऊराव दडमल यास सात वर्षाचा सश्रम कारावास व वीस हजार रुपये चा दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपीने दंड न भरल्यास आरोपीस सहा महिन्याचा सश्रम कारावा  भोगावा लागणार आहे.
        या घटनेत  सरकार पक्षातर्फे ऍड. उराडे यांनी काम पाहिले. शेगाव पोलीस स्टेशन च्या पोहवा निराशा टेंभेकर यांनी घटनेची पैरवी केली.

Comments