लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

गौमाता सन्मान दिवस” निमित्त वरोऱ्यात जनजागृती; तहसीलदारांना निवेदन सादर

“गौमाता सन्मान दिवस” निमित्त वरोऱ्यात जनजागृती; तहसीलदारांना निवेदन सादर
बातमी:28/4/26

वरोरा : “गौमाता सन्मान दिवस” निमित्त वरोरा शहरात विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्या वतीने गौमाता संरक्षण, सेवा व सन्मान यासाठी जनजागृती अभियान राबवण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत कार्यकर्त्यांनी एकत्र येत वरोरा तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले.
या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी गौमातेला भारतीय संस्कृतीत अत्यंत पूजनीय स्थान असल्याचे सांगत तिचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. तसेच शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात राज्य व देशात गौहत्या बंदी अधिक कडक करणे, गोरक्षणासाठी कठोर कायदे व प्रभावी अंमलबजावणी करणे, गौमातेला “राष्ट्रमाता” दर्जा देण्याचा विचार करणे, भटक्या व निराधार गाईंसाठी निवारा व संगोपन केंद्रे वाढवणे तसेच शेतकऱ्यांना गाईंच्या संगोपनासाठी आर्थिक मदत व योजना उपलब्ध करून देणे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
या प्रसंगी अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शांततेत व शिस्तीत आपली भूमिका मांडत प्रशासनाकडे निवेदन सादर केले. या उपक्रमामुळे परिसरात गौमाता संरक्षणाबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली.

Comments