वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा येथे घरासमोरून दुचाकी चोरी; २० हजारांची होंडा पॅशन लंपास

वरोरा येथे घरासमोरून दुचाकी चोरी; २० हजारांची होंडा पॅशन लंपास

बातमी: चेतन लूतडे 

वरोरा : शहरातील सुभाष वॉर्ड परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुशर्रफ नैमुद्दीन सय्यद (वय 28) हे आपल्या कुटुंबासह सुभाष वॉर्ड येथे वास्तव्यास असून खाजगी व्यवसाय करतात. त्यांचे मामा मोहम्मद रिजवान ईब्राहीम शेख (रा. फैजनगर, यवतमाळ) यांच्या मालकीची काळ्या-लाल रंगाची होंडा पॅशन (क्र. MH 29 A 5854) ही मोटारसायकल सध्या मुशर्रफ सय्यद वापरत होते.
दि. 23 एप्रिल 2026 रोजी त्यांनी सदर दुचाकी घरासमोर उभी करून सावंगी मेघे येथे गेले होते. दरम्यान सायंकाळी सुमारे 7.30 वाजेपर्यंत गाडी जागेवर होती, मात्र त्यानंतर अज्ञात चोरट्याने ती लंपास केल्याचे समोर आले. याबाबत कुटुंबीयांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र गाडी आढळून आली नाही.
चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत अंदाजे 20 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Comments