लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

घरफोडीचा प्रकार : वरोरा येथे ४१,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी

घरफोडीचा प्रकार : वरोरा येथे ४१,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी

वरोरा (प्रतिनिधी): चेतन लूतडे 22/4/26

तालुक्यातील नागरी परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
देवराव संभाजी घुबडे (वय ७२, व्यवसाय शेती, रा. नगरी, वरोरा) यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे दिलेल्या तोंडी फिर्यादीनुसार, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजता ते पत्नी सौ. सुरेखा घुबडे यांच्यासह घराला कुलूप लावून हिंगणघाट येथे एस.टी. महामंडळाचे कार्ड बनविण्यासाठी गेले होते.
दुपारी सुमारे २.३० वाजता घरी परत आल्यावर घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा आढळला. घरात प्रवेश करून पाहणी केली असता लोखंडी कपाट उघडलेले दिसले. कपाटात ठेवलेली ५,५०० रुपयांची रोख रक्कम तसेच अंदाजे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची जुनी पोत (अंदाजे किंमत ३६,००० रुपये) असा एकूण ४१,५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील वरोरा पोलीस तपास करीत आहेत.

Comments