लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

‘अमृत २.०’ अंतर्गत लेंडाळा तलाव पुनरुज्जीवन कामाचे भूमिपूजन; वरोरा-भद्रावती आमदार करण देवतळे यांच्या हस्ते सोहळा संपन्न

‘अमृत २.०’ अंतर्गत लेंडाळा तलाव पुनरुज्जीवन कामाचे भूमिपूजन; वरोरा-भद्रावती आमदार करण देवतळे यांच्या हस्ते सोहळा संपन्न

भद्रावती : प्रतिनिधी
नगरपरिषद भद्रावती क्षेत्रातील केंद्र पुरस्कृत ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत लेंडाळा तलाव सरोवर पुनरुज्जीवन कामाचे भूमिपूजन वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे तलावाचे सौंदर्य वाढण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असून नागरिकांसाठी एक आकर्षक व उपयुक्त ठिकाण विकसित होणार आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून भविष्यात नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक परिसर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तलाव परिसराचे सुशोभीकरण होऊन पर्यटनाला चालना मिळेल तसेच नागरिकांसाठी विश्रांतीचे उत्तम केंद्र निर्माण होईल, अशी अपेक्षा आ. देवतळे. व्यक्त केली जात आहे.
या प्रसंगी वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार करण देवतळे यांचासह  नगरपरिषद मुख्याधिकारी विशाखाताई शेळकी, नगराध्यक्ष प्रफुलजी चटकी, उपनगराध्यक्ष सुधीरजी सातपुते, अनिलजी धनोरकर, पाणीपुरवठा सभापती वृषालीताई पांढरे, नगरसेवक, नगरसेविका तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.....................

Comments