वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला


खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार
 पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

बातमी: वरोरा 16/4/26

वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला.
या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते.

“संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे यांचे कार्य होय.
....
.    गौरव बोरा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Comments