वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा येथील धक्कादायक घटना : स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरला आग, शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.


वरोरा येथील धक्कादायक घटना : स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरला आग, 
शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.


बातमी:17/4/26

वरोरा (जि. चंद्रपूर) – साई नगर, वरोरा येथील जयंत मोतीराम दातारकर यांच्या घरी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलेंडरला आग लागल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत रेखा जयंतराव दातारकर यांच्या पायाला किरकोळ इजा झाली असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, रेखा दातारकर या नेहमीप्रमाणे घरात स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला. या अचानक झालेल्या प्रकारामुळे घरात घबराट निर्माण झाली. त्यांनी तात्काळ आरडाओरड केल्याने शेजारील नागरिक धावून आले.

प्रसंगावधान राखत शेजाऱ्यांनी जळत असलेला सिलेंडर घराबाहेर काढला व सुरक्षित ठिकाणी नेऊन रेतीच्या ढिगाऱ्यावर टाकला. यानंतर सिलेंडरमधील गॅस बाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिकांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यात यश आले.

या घटनेत रेखा दातारकर यांच्या पायाला किरकोळ भाजल्या गेल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, संबंधित सिलेंडर हा स्नेहा गॅस एजन्सी, वरोरा मधून दोन दिवसांपूर्वीच आणल्याची माहिती रेखा दातारकर यांनी दिली. या घटनेनंतर सिलेंडरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणेकडून चौकशीची मागणी होत आहे.

Comments