लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के

संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के


वरोरा, दि. १६ एप्रिल: येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलने यंदाच्या शैक्षणिक सत्रातील परीक्षेत तालुकास्तरावर आपला दबदबा कायम राखत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. शाळेची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली असून विद्यार्थिनी अदिती गायकवाड हिने तब्बल ९६.०० टक्के गुण प्राप्त करून वरोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शाळेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी एकूण ९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी सर्वच्या सर्व ९० विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला असून शाळेचा निकाल १००% लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तब्बल २५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य (डिस्टिंक्शन) मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.

या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शाळेच्या वतीने अदिती गायकवाड हिचा विशेष सत्कार करण्यात येणार असून तिच्या यशामुळे संपूर्ण वरोरा परिसरात शाळेचे कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे हे फलित असल्याचे प्रतिक्रिया शाळा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.
...........

Comments