लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी"


"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी"

वरोरा-

आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथे भारतरत्न डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. गोपाल वरुटकर,प्रमुख वक्ते:- प्रा. डॉ. नरेंद्र पाटील (अर्थशास्त्र विभाग प्रमुख)
प्रा. नीरज आत्राम ( रा. से. यो.कार्यक्रम अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. गोपाल वरुटकर यांनी भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकरांच्या महान कार्याचा आढावा घेताना सांगितले की, “डॉ.बाबासाहेबांनी केवळ भारतीय संविधानाची निर्मिती केली नाही, तर त्यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात करणे अत्यंत आवश्यक आहे.” तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचे भान ठेवून प्रगतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, आजच्या काळात डॉ.बाबासाहेबांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरत असून, तरुणांनी त्यांचे विचार आत्मसात करून देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. नरेंद्र पाटील यांनी आपल्या प्रभावी भाषणात डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा सखोल आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “डॉ. आंबेडकर हे केवळ संविधान निर्माता नव्हते, तर ते एक दूरदृष्टी असलेले अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी भारताच्या आर्थिक विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक विचार मांडले.”
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचे अनुसरण करून स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक बनण्याचा संदेश दिला.
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आणि समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नीरज आत्राम (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशाल शेरकी यांनी उत्कृष्टरीत्या केले, तर आभार प्रदर्शन अक्षरा बावणे हिने केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांचे विशेष योगदान लाभले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षकवृंद व बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments