वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

खांबाडा येथे महिलेकडून अवैध दारू विक्री; पोलिसांची कारवाई, २२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

खांबाडा येथे महिलेकडून अवैध दारू विक्री; पोलिसांची कारवाई, २२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बातमी: चेतन लूतडे 

वरोरा, दि. 9 एप्रिल – पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे वरोरा पोलीस ठाण्याच्या पथकाने खांबाडा येथे छापा टाकून ४५ वर्षीय महिलेकडून अवैध दारू जप्त केली. आरोपी लिना चंद्रकांत बोरकर ही मजुरीचा धंदा करते व खांबाडा येथील बस स्टॉपजवळील खोलगट भागात देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस निरीक्षक शरद श्याम भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांच्या उपस्थितीत संशयित महिलेकडे झडती घेतली असता तिच्याकडून ३८ सिलबंद देशी दारूच्या शिश्या (प्रत्येकी ९० एम.एल.), ७०० रुपये रोकड असा एकूण २,२२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीकडे दारूचा कोणताही परवाना नसल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५(ई) अन्वये दिनांक सात तारखेला वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे . वरोरा आणि खांबाडा येथील दोन पंचाच्या समक्ष पंचनामा करून दारूचा नमुना तपासणीसाठी जप्त करण्यात आला. 
ही दारू कुठून विकत घेतली होती याचा तपास वरोरा पोलीस करीत आहे. वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावागावात अवैध दुकानातून दारू विक्री होत असल्याने पोलिसांनी आपली मोहीम जोरात सुरू केली आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, वरोरा याबाबत कोणती कारवाई करेल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता महिला सुद्धा दारू विक्रेते बनले असून तालुक्यात अवैध दारू विक्रेते मोठ्या प्रमाणात फोपावले असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
.................

जाहिरात 

Comments