वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा पोलिसांची कारवाई : सार्वजनिक ठिकाणी कल्याण सट्टा खेळणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल


                    आर्टिफिशल इमेज

वरोरा पोलिसांची कारवाई : सार्वजनिक ठिकाणी कल्याण सट्टा खेळणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल

वरोरा, दि. 7 एप्रिल – वरोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने मौजा चिकनी येथील सायकल स्टोअर्स समोर सार्वजनिक ठिकाणी कल्याण सट्टा (जुगार) खेळविणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम व सट्ट्याच्या चिठ्या जप्त केल्या आहेत.

पोलीस हवालदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, चिकनी गावात एक व्यक्ती गळ्यात काळा दुपट्टा टाकून १ ते १० आकडे लिहिलेल्या चिठ्यांद्वारे कल्याण सट्टा खेळवत आहे. यावरून पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. छापा टाकताच तेथील इतर व्यक्ती पळून गेल्या, मात्र गळ्यात दुपट्टा असलेला आरोपी रमजु मस्तान शेख (वय ३२, रा. मालविय वार्ड, वरोरा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्या अंगझडतीत रोख १४४० रुपये, कल्याण सट्ट्याचे आकडे लिहिलेली चिठ्ठी व एक बॉलपेन (किंमत ५ रु.) असा एकूण १४४५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत.
.................

Comments