लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भाजपच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूरमध्ये सन्मान समारंभ; जिल्हा बँक अध्यक्ष, आमदार उपस्थित

भाजपच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूरमध्ये सन्मान समारंभ; जिल्हा बँक अध्यक्ष, आमदार उपस्थित

चंद्रपूर, (दि. ६ एप्रिल): भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर महानगर कार्यालयात एक ऐतिहासिक सोहळा पार पडला. याप्रसंगी चंद्रपूर मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, आमदार किशोर जोरगेवार, अशोक जीवतोडे, सुभाष कासमगोट्टीवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने जनसेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या पक्षाच्या गौरवशाली प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला. या सोहळ्यात एका कार्यकर्त्याचा पक्षाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. सन्मानित कार्यकर्त्याने पक्ष संघटना व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानून पक्षाची ध्येयधोरणे व भविष्यातील विकासाच्या वाटचालीबाबत चर्चा केली.

आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाने सामान्यांच्या जीवनात घडवलेले परिवर्तन अधोरेखित केले. यावेळी उपस्थित सर्वांनी ‘संकल्प पुढे नेण्याचा’ विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या समारोपी सर्व कार्यकर्ते व हितचिंतकांना भाजपच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments