लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात बांधकाम साईटवरून 50 हजारांचा साहित्य चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

वरोऱ्यात बांधकाम साईटवरून 50 हजारांचा साहित्य चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
बातमी:28/4/26

वरोरा : शहरातील कॉलरी वॉर्ड परिसरात बांधकाम सुरू असलेल्या साईटवरून सेंट्रींगच्या लोखंडी प्लेटांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नरेंद्र नागोजी चौखे (वय 35, व्यवसाय ठेकेदार, रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते वसंतराव खामनकर देशपांडे पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस सुरू असलेल्या घराच्या बांधकामाचे काम पाहत आहेत. त्यांनी साईटवर सेंट्रींगच्या लोखंडी प्लेटा ठेवलेल्या होत्या.
दि. 25 एप्रिल रोजी रात्री सुमारे 10 वाजता साईटवर 200 प्लेटा असल्याची खात्री करून ते घरी गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी (दि. 26 एप्रिल) सकाळी 9.30 वाजता साईटवर गेल्यावर 50 प्लेटा गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आजूबाजूला शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत.
अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळेत सुमारे 50 हजार रुपये किंमतीच्या 50 लोखंडी सेंट्रींग प्लेटा चोरी करून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत
.........

Comments