वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

नंदोरीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 4 जण ताब्यात, 2.34 लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदोरीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 4 जण ताब्यात, 2.34 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी:28/4/26

वरोरा : भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी धाड टाकत चार जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, पत्ते व दुचाकी असा एकूण 2 लाख 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस हवालदार सुखराज यादव (ब. नं. 711) यांच्यासह पोलीस पथक 25 एप्रिल रोजी सायंकाळी पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, नंदोरी गावातील शेतशिवारात काही जण पैशांची हार-जीत लावून जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन सापळा रचला.
आंब्याच्या झाडाखाली काही जण ‘52 तास’ पत्त्यांवर जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापा टाकताच काही जण पळून गेले, तर चार जणांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गजानन मारोती बल्की (वय 30), राहुन भाऊराव अवगान (वय 29), कैलास मधुकर ढवस (वय 37) व गणेश नंदकिशोर शिवरकर (वय 21, सर्व रा. नंदोरी, ता. भद्रावती) यांचा समावेश आहे.
आरोपींकडून 9,900 रुपये रोख व 12 तास पत्ते जप्त करण्यात आले. तसेच जुगाराच्या डावावरून 4,600 रुपये व 40 तास पत्ते मिळून आले. याशिवाय घटनास्थळी आढळलेल्या पाच दुचाकी वाहनांचाही पंचासमक्ष जप्त करण्यात आला. जप्त वाहनांची किंमत सुमारे 2,20,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले.
एकूण 14,500 रुपये रोख, 52 तास पत्ते व 5 दुचाकी असा एकूण 2,34,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments