वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

खापरीत अवैध दारू विक्रीवर पोलिसांची दुहेरी कारवाई; महिलेसह वृद्धावर गुन्हे, 32 शिश्या व रोख जप्त

खापरीत अवैध दारू विक्रीवर पोलिसांची दुहेरी कारवाई; महिलेसह वृद्धावर गुन्हे, 32 शिश्या व रोख जप्त

वरोरा/28/4/26/चेतन लूतडे 

वरोरा : तालुक्यातील खापरी परिसरात अवैध देशी दारू विक्रीवर वरोरा पोलिसांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत एका महिलेसह एका वृद्धाविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले असून एकूण 32 शिश्या व 500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पहिल्या कारवाईत गिरजा राजु कुरसंगे (वय 43, रा. खापरी) हिला खापरी रोडवरील नाल्याजवळ पकडण्यात आले. पोलिसांनी पंचासमक्ष तपासणी केली असता तिच्याकडून 25 नग देशी दारूच्या प्लास्टिक सिलबंद शिश्या (प्रत्येकी 90 मि.ली.) जप्त करण्यात आल्या. याशिवाय दारू विक्रीतून मिळालेली 500 रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. जप्त मालाची किंमत सुमारे 1000 रुपये आहे.
दुसऱ्या कारवाईत विठ्ठल मारोती मेश्राम (वय 75, रा. खापरी) याला डोंगरगाव-खापरी मार्गावर नाल्याजवळ पकडण्यात आले. त्याच्याकडून 7 नग देशी दारूच्या शिश्या (प्रत्येकी 90 मि.ली.) जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे 280 रुपये आहे.
दोन्ही प्रकरणांत आरोपींकडे दारू बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचासमक्ष दारू जप्त करून नमुना शिश्या सील केल्या आहेत.

या दोन्ही कारवाया पोलीस हवालदार संतोष किसन पवार व त्यांच्या पथकाने पेट्रोलिंगदरम्यान मुखबिराच्या माहितीवरून केल्या. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कलम 65 (ई) नुसार गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
...............

Comments