वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

पावना-मोरवा मार्गावर अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड; 22 बॉटल जप्त, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

पावना-मोरवा मार्गावर अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड; 22 बॉटल जप्त, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.


वरोरा : पावना ते मोरवा मार्गावर अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर वरोरा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई 26 एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलीस हवालदार नरेशकुमार नन्नावरे (ब. नं. 2414) व पोलीस अंमलदार शरद मस्के (ब. नं. 2069) हे नंदोरी बिट परिसरात प्रोव्हीजन रेड पेट्रोलिंग करत असताना त्यांना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, पावना येथील दिलीप गणपत जिलटे (वय 42) हा पावना ते मोरवा जाणाऱ्या रस्त्यावर एका झाडाखाली अवैधरित्या दारू बाळगून विक्री करत आहे.

माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी जाऊन सापळा रचला. तेथे संशयित इसम हातात कापडी पिशवी घेऊन उभा असल्याचे दिसून आले. त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता पिशवीत 22 नग देशी दारूच्या सिलबंद प्लास्टिक शिश्या (प्रत्येकी 90 मि.ली.) आढळून आल्या. या दारूची किंमत सुमारे 880 रुपये असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीकडे दारू बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आल्याने पोलिसांनी दारू जप्त केली. नमुना शिशी सील करून तपासासाठी ठेवण्यात आली. पंचनामा सायंकाळी 5.00 ते 6.15 वाजेदरम्यान करण्यात आला.
या प्रकरणी दिलीप गणपत जिलटे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कलम 65 (ई) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

 ..............
.           Happy Birthday Parikshit ekare

Comments