वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

पिसाळलेल्या कुत्र्याला दुर्दैवी अंत ; टिळक वार्ड येथील मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, पालिकेचे दुर्लक्ष

पिसाळलेल्या कुत्र्याला दुर्दैवी अंत ; टिळक वार्ड येथील मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, पालिकेचे दुर्लक्ष

टिळकवार्ड,वरोरा, दि. २४ मार्च : शहरातील टिळकवार्ड परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात फिरायला जाणारे नागरिक, लहान मुले तसेच रात्रीच्या वेळी हॉटेलवरून येणाऱ्या व्यक्तींना व रहदारी करणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांपासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अखेर गेल्या रविवारी वैभव किराणा दुकानाजवळ फिरत असलेल्या एका पिसाळलेल्या कुत्र्याचा दुर्दैवी अंत झाला.

परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून हा कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांना चावा घेत होता. पंधरा ते वीस व्यक्तींना व लहान मुलांना गंभीर जखमी केल्याने परिसरात लहान मुलांना खेळणेही अवघड झाले होते. विशेष म्हणजे या कुत्र्यांच्या शरीरावरील कातडी गळून पडल्यासारखी दिसत असून, त्यांना आजार झाले असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शहरातील मोकाट कुत्र्यांचे मोठे झुंड असून, अशा कुत्र्यांमुळे एखाद्या लहान मुलावरही हल्ला होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, अद्यापही नगरपालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिलेले नाही. पालिकेने याबाबत विचारणा केली असता, कुत्रे पकडण्यासाठीचे कंत्राट अद्याप कोणी घेतले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आतापर्यंत पालिकेतर्फे मोकाट कुत्र्यांना पकडण्याची किंवा बंदिस्त गृहात ठेवण्याची कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

दरम्यान, शहरातील नागरिकांना या कुत्र्यांमुळे जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. पालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.

Comments