वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*खासदार प्रतिभा धानोरकर यांची 'भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटा'वर निवड*

*खासदार प्रतिभा धानोरकर यांची 'भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटा'वर निवड*

चंद्रपूर :  खासदार प्रतिभा धानोरकर यांची 'भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटा'च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १८ व्या लोकसभेच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून, लोकसभेच्या माननीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार ही निवड जाहीर झाली आहे.

लोकसभा सचिवालयाकडून (परिषद आणि शिष्टाचार शाखा) यासंदर्भातील अधिकृत पत्र खासदार प्रतिभा धानोरकर यांना प्राप्त झाले आहे. भारत आणि उझबेकिस्तान या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, दोन्ही राष्ट्रांमधील सांस्कृतिक व राजकीय देवाणघेवाण वाढवणे, हा या मैत्री गटाचा मुख्य उद्देश आहे.

या महत्त्वाच्या निवडीबद्दल खासदार प्रतिभा धानोरकर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला असून, कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय 
अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी, कॉंग्रेस नेत्यां खासदार प्रियंका गांधी, यांचे त्यांनी आभार मानले.

Comments