वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

चंद्रपूरमध्ये चर्चमधील दानपेटी तोडून चोरी; सीसीटीव्हीत चोरटा कैद

 चंद्रपूरमध्ये चर्चमधील दानपेटी तोडून चोरी; सीसीटीव्हीत चोरटा कैद

चंद्रपूर, (२७/३/२६): शहरातील संत आत्रीयान ख्रिश्चन कॉलनी परिसरातील एका चर्चमध्ये अज्ञात चोरट्याने दानपेटी तोडून सुमारे ६ हजार रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २६) पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली असून, चर्चमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्याची हालचाल कैद झाली आहे.

चर्चच्या समिती सदस्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २५ रोजी रात्री दहा वाजता चर्च बंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याने दानपेटी तुटलेली असल्याचे सांगितले. यानंतर समिती सदस्यांनी पाहणी केली असता दानपेटीतील अंदाजे ६ हजार रुपये गायब असल्याचे आढळले.

चर्च फास्टेड कमेटीचे सदस्य व एसबीआय लाइफ बँकेतील मॅनेजर सभास्टीयन स्वात्रीक जॉन (वय ५०) यांनी याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, दि. १४ मार्च रोजी दानपेटी उघडल्यानंतर पुन्हा उघडली नव्हती. या कालावधीत सुमारे ६ हजार रुपये जमा झाले असावेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे ४.३० वाजता एक अज्ञात व्यक्ती दानपेटी फोडून चोरी करताना दिसत असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरीचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला आहे.

Comments