वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोरा येथे पुलाच्या कामासाठी खड्डा उघडा ठेवल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी; विभाग व कंत्राटदारावर कारवाईची मागणी

वरोरा येथे पुलाच्या कामासाठी खड्डा उघडा ठेवल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी;  विभाग व कंत्राटदारावर कारवाईची मागणी

वरोरा, (२७/३/२६): सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात दोघे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. बोर्ड ते पावना या मार्गावरील पुलाच्या बांधकामासाठी रस्त्यावर उघडा ठेवलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी पडल्याने हा अपघात झाला. जखमी तरुणांवर नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली असून, एकाच्या डोक्याचे ऑपरेशन बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

आकाश येकांजी बारसागडे (वय २९, रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास ते त्यांचे मित्र अंकित गजानन करडभूजे (वय २७) व गोपाल पुरुषोत्तम विरुटकर हे तिघे दुचाकी (क्र. एम.एच. ३४ बीएक्स ४४९४) ने आगरा येथून परत येत होते. अंधार असताना पुलाच्या कामाजवळ कोणतेही दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर किंवा सुरक्षा बंधारे नव्हते. फक्त पांढरी पट्टी होती, मात्र तीही व्यवस्थित दिसत नव्हती. त्यामुळे पुढे मोठा खड्डा असल्याचे लक्षात येण्याआधीच दुचाकी खड्ड्यात कोसळली.

या अपघातात आकाश बारसागडे व अंकित करडभूजे हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही प्रथम जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले व नंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. आकाश यांच्या दोन्ही हातांची शस्त्रक्रिया तसेच चेहऱ्यावर टाके लावण्यात आले असून, अंकित करडभूजे यांचा हाताची शस्त्रक्रिया झाली असून डोक्याचे ऑपरेशन बाकी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार कंपनीकडून कोणतीही मदत न करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत पडून असताना ग्रामस्थांनी धावून त्यांना रुग्णालयात दाखल केले.

आकाश बारसागडे यांनी या प्रकरणी संबंधित विभाग व कंत्राटदार कंपनीविरुद्ध एफ.आय.आर. नोंदवून कठोर कारवाई करण्याची, तसेच झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसानीबद्दल नुकसानभरपाई व वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Comments